*दिनांक : 22 डिसेंबर* ( वर्षातील सर्वात लहान दिवस )
*गणित दिवस*
☀ *श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांची जयंती* ☀
यानिमित्त त्यांच्या स्मृतीस
*विनम्र अभिवादन*
■ अल्पपरिचय
*जन्म व संशोधन
या महान गणितज्ञाचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात तिरोडा या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणित सिध्दांत सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिक सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षाचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधना विषयी माहिती झाली आणि संशोधनाच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होवू लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिजट्रीनिटी काँलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजननी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत. असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते.
लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी ३२ संशोधनपर लेख लिहले. १९१८ साली रॅयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षाचे होते. त्या नंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी काँलेजची फेलोशिप मिळाली. ही फिलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत...
*मृत्यू
*मृत्यू
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले, त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी २७ एप्रिल १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले.त्यांच्या निधनाने केवळ भरतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणित विश्वाचे नुकसान झाले.
या निमित्त आपल्या विद्यालयात, परिसरातील शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात गणिताशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो.
व्याख्यान,
गणितज्ज्ञ यांचे जीवन कार्य परिचय,
गणित सम्मेलन ,
भौमितीक रांगोळी स्पर्धा ,
गणितीय कविता,
गीत सादरीकरण स्पर्धा,
पाढे, सुत्र पाठांतर,
गणितीय प्रश्नमंजूषा स्पर्धा ,
गणित प्रदर्शन
असे विविध कार्यक्रम घेता येवू शकतात.
*आपल्याला गणित दिनाच्याच्या मनपूर्वक शुभेच्छा..*
No comments:
Post a Comment