(इयत्ता नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी )
नमस्कार विद्यार्थी/शिक्षक मित्रहो,
इयत्ता दहावीच्या गणित विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान पक्के असणे आवश्यक असते. दहावी गणित विषयासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्वज्ञानावर आधारीत काही महत्वाच्या घटकांची उजळणी व सराव करण्याच्या दृष्टीने " सोबत घेऊ स्मार्ट पीडीएफची, करू पूर्वतयारी दहावी गणिताची " हा उपक्रम मागील वर्षापासून सुरु केला. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२०.२१ मध्ये कोल्हापूर जिल्हास्तरावर या उपक्रमास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
या उपक्रम अंतर्गत पूर्वज्ञानावर आधारीत दररोज एक घटक ब्लॉगवर Smart pdf स्वरुपात प्रकाशित करण्यात येईल. ही Smart pdf फक्त डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. डाऊनलोड केल्यानंतर pdf ऑफलाईन वापरता येईल किंवा Pdf ची प्रिंट वापरता येईल. या Pdf मध्ये प्रत्येक घटकाच्या थोडक्यात माहितीसह संबधित व्हिडीओजचे QR कोड दिले आहेत. ते scan केल्यास किंवा मोबाईलमध्ये QR कोडला स्पर्श केल्यास व्हिडीओ ओपन होईल. स्वयंअध्ययन/सरावासाठी सरावसंचही दिला आहे.
विद्यार्थ्यांनी दररोज एक घटक याप्रमाणे याचा मन:पूर्वक सराव केल्यास गणित विषयात नक्कीच सुयश मिळेल. या उपक्रमासाठी वेगळी वही वापरा व त्यात सर्व माहिती एकत्रित संग्रहीत करा. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा ...
स्मार्ट पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील घटकावर क्लिक करा.
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
या उपक्रमात आपण सहभागी झाला असाल तर खालील लिंकवर क्लिक करून उपक्रमाविषयी आपला अभिप्राय नक्की द्या...
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
दहावी गणित विषयासाठी सुट्टीच्या कालावधीतील YouTube Live क्लासमध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Whats Group मध्ये सहभागी व्हा.
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या पोस्टखाली असणाऱ्या Comments वर क्लिक करा. व Enter Your Comment येथे क्लिक करून आपली प्रतिक्रिया नोंदवा.
धन्यवाद...
⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿⦿
∎ आपला गणितमित्र ∎
श्री. विशाल पोतदार.
गणित अध्यापक
Very nice sir 👍
ReplyDeleteऋतुजा शेळके
ReplyDeleteRutuja
ReplyDeleteShelake
खूप उपयुक्त माहिती. गणित विषयाचा खजीनाच. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शक.. Keep it up.. अभिनंदन सर व आपणांस पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेछ्या !!
ReplyDelete