करोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यामुळे अनेकांना पद्धतशीर शिक्षण मिळू शकले नाही तर, काहींना ऑनलाइनची सुविधा नसल्याने शिक्षण घेता आले नाही. या तक्रारी विचारात घेऊन या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा मागील इयत्तेचा पाया पक्का व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याची निर्मिती केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिले ४5 दिवस मागील इयत्तेचे शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यपुस्तिका किंवा अन्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.
विषयनिहाय व इयत्तानिहाय सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) डाऊनलोड करण्यासाठी खालील download वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment